MPSC Pre 2020 Paper 1 Answer Key Read more
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रवेशप्रमाणपत्र जाहीर maharashtra Engineering Service Pre Examination Hall Ticket Notification Click on this link to download Hall ticket without... Read more
Revised time table for MPSC exam declared on mpsc website today . It will be Conducted on 21st MArch 2021. Read more
Mpsc Exam postponed again !! Examinations for schools, colleges and vocational courses had been postponed due to the situation created by the corona in the state over the past year. M... Read more
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० दि. १४ मार्च २०२१ – Important Instruction MPSC State Service Pre Exam 2020 which is finally held on 14 march 2021 on different locations across the state.... Read more
hello everyone check MAHAMPSC Telegram channel link below.
click and subscribe to get latest post on your Telegram channel.
MPSC State Service 2021 Prelims Admit Card Released @mahampsc.mahaonline.gov.in. Check MPSC Admit Card Download Link, Instructions and other details here. MPSC State Service 2021 Prelims:... Read more
– Notice to MPSC Candidates – Special Note: – It is strictly forbidden to bring, carry or use mobile phones or other telecommunication devices in the premises of th... Read more
अर्थसंकल्पीय अधिवेशन ५ मार्च २०२१ – थेट प्रक्षेपण Read more
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० – उमेदवारांना सूचना

mpsc exam
– उमेदवारांना सूचना – | ||
विशेष सूचना:- मोबाईल फोन अथवा अन्य दूरसंचार साधने परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात आणण्यास, बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
– उमेदवारांना सूचना – 1. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले सदर मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. 2. परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीकरीता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहून उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. 3. उमेदवारांची तपासणी/झडती (Frisking), थर्मो गनच्या सहाय्याने उमेदवारांच्या शारीरिक तापमानाची तपासणी (Thermal Screening) , मुखपट, हातमोजे व सॅनिटायझरची पिशवी असलेले किट उपलब्ध करुन देणे, लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करणे, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे इत्यादी स्वरुपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 4. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उदभवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 5. परीक्षा कक्षामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. 6. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्या वेळी स्वतंत्रपणे सादर करणे अनिवार्य आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही व उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. 7. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणि/अथवा वर नमूद पाच वैध (Valid) ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. 8. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल. 9. नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहीत स्त्रियांच्या बाबतीत), नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. 10. परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील:- (1) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र 11. लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी देण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 4 मार्च, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचनां’मधील सूचना क्रमांक 4.1 मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे परीक्षा कक्षामध्ये नेण्यास परवानगी राहील. तथापि, आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे परीक्षा कक्षामध्ये घेऊन गेल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 12. परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य (पॅड, पाऊच, पर्स इत्यादी) जवळ बाळगल्यास ते आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून कारवाई करण्यात येईल. 13. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वहया, नोटस, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, लेखन पॅड, पाऊच, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने/साहित्य परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वत:जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. 14. आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आयोग, जिल्हा प्रशासन किंवा शाळा/ महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. 15. परीक्षेच्या वेळी हजेरीपट तसेच उत्तरपत्रिकेवरील नोंदी काळजीपूर्वक भराव्यात. हजेरीपटावर विहित जागेत उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपुस्तिकेचा छापील अनुक्रमांक लिहून संपूर्ण स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे. 16. परीक्षेस अर्ज सादर करताना केलेली स्वाक्षरी, प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिका तसेच हजेरीपटावर केलेली स्वाक्षरी एकच असणे व ती भविष्यातील कोणत्याही टप्प्यावरील पडताळणीच्या वेळी एकमेकांशी उमेदवाराच्या दैनंदिन वापरातील स्वाक्षरीशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. 17. उत्तरपत्रिकेवर प्रश्नपुस्तिका क्रमांक व संच क्रमांक इत्यादी माहिती लिहून झाल्यावर प्रश्नपुस्तिका बदलून दिली जाणार नाही. तसेच या संदर्भात परीक्षेनंतर आलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. 18. प्रश्नपुस्तिकेत काही त्रुटी आढळल्यास संबंधित समवेक्षक, पर्यवेक्षक अथवा परीक्षा उपकेंद्रप्रमुख यांच्याकडे विचारणा अथवा चर्चा करु नये. प्रश्नपुस्तिकेमधील त्रुटींसंदर्भात लेखी निवेदन सहसचिव व परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुख्य कार्यालय, 8 वा मजला कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई- 400021 यांच्याकडे संपूर्ण तपशीलासह परीक्षेच्या दिनांकापासून आठ दिवसांच्या आत सादर करावे. 19. प्रश्नपुस्तिकेच्या मुख पृष्ठावर इंग्रजी आद्याक्षर (A,B,C,D) हे संच क्रमांक दर्शविते. प्रश्नपुस्तिकेवरील सदर संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे नमूद करणे व संबंधित वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. 20. प्रश्नपुस्तिकेचा संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे न नोंदविल्यास शून्य गुण देण्यात येतात. प्रश्नपुस्तिकेचा संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी नमूद करण्यामध्ये त्रुटी राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. तसेच, या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. 21. परीक्षा सुरु झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारास कोणत्याही कारणासाठी परीक्षा कक्षाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. 22. उत्तरपत्रिका किंवा प्रश्नपुस्तिका परीक्षा कालावधीत परीक्षा कक्षाबाहेर घेऊन जाता येणार नाही. तसेच, परीक्षेच्या कालावधीत संपूर्ण उत्तरपत्रिका आणि परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेचा भाग-1 परीक्षा कक्षाबाहेर घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. 23. परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका लगेचच समवेक्षकांच्या ताब्यात द्याव्यात. तसेच सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिका समवेक्षकाकडे जमा होवून त्याचा हिशोब लागेपर्यंत कोणत्याही उमेदवारास परीक्षा कक्षाबाहेर जाण्याची परवानगी नाही. 24. परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका समवेक्षकाकडे जमा न करताच परीक्षा कक्षाबाहेर घेऊन गेल्यास अशी कृती आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कडक कारवाई करण्यात येईल. 25. उत्तरपत्रिकेमध्ये विहित केलेल्या ठिकाणीच आपली उत्तरे नमूद करावीत. प्रश्नपुस्तिकेवर वा अन्य ठिकाणी उत्तरे लिहिल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केले आहे, असे समजून कारवाई करण्यात येईल. 26. उत्तरपत्रिकेवर नोंदविलेल्या उत्तरांची संख्या नमूद करण्यासंदर्भात उमेदवारांना विशेष सूचना :- 26.1 परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर उमेदवाराने सोडविलेल्या प्रश्नांची, (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या अचूकपणे उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. त्याकरीता उमेदवारास परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी संपल्यानंतर दोन मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येईल. 26.2 परीक्षेच्या प्रत्यक्ष वेळेनंतरच्या दोन मिनिटांच्या अतिरिक्त कालावधीमध्ये उमेदवाराने सोडविलेल्या प्रश्नांची, (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या मोजून अचूकपणे विहित ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. त्याशिवाय अन्य कोणतीही कृती या अतिरिक्त वेळेमध्ये करता येणार नाही. 26.3 उमेदवारांना सोडविलेल्या प्रश्नांची, (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद करण्याकरीता परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी संपल्यानंतर दोन मिनिटापेक्षा अधिक वेळ मिळणार नाही. 27. परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने विशेष सूचना:- 27.1 परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी मुखपट (Mask) परिधान करणे अनिवार्य आहे. 27.2 परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षेच्या संपूर्ण कालावधीमध्ये करणे अनिवार्य आहे. 27.4 कोव्हिड-19 सदॄश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला, इत्यादी दिसून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी /कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. 27.5 उमेदवारांनी “आरोग्य सेतू” ॲप डाऊनलोड करणे व त्याद्वारे स्वयंमुल्यांकन करणे, उमेदवाराच्या हिताचे राहील. 27.6 उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा/अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणणे, उमेदवाराच्या हिताचे राहील. 27.7 दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. 27.8 परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास उमेदवारांना सक्त मनाई आहे. 27.9 शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे सर्व उमेदवारांनी कटाक्षाने पालन करावे. 27.10 प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आल्यास यासंदर्भात आयेागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. तसेच संबधित उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्याची व्यवस्था करण्यात येईल. 27.11 परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक /परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे. 27.12 वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझर पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील फक्त आच्छादित कुंडीमध्ये (Dust Bin) टाकाव्यात. 27.13 कोव्हिड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे. 27.14 संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सूचनेनुसार पडताळणीकरीता उमेदवारास चेह-यावरील मुखपट काढणे अनिवार्य राहील. 28. सर्वसाधारण सूचना :- 28.1 प्रस्तुत प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रवेशासाठी निर्गमित करण्यात आले असून परीक्षेस प्रवेश दिला, म्हणून आयोगाने उमेदवारी स्वीकारली, असा अर्थ होत नाही. उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. 28.2 प्रवेश प्रमाणपत्राच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारावरच राहील. अन्य व्यक्तीकडून कोणत्याही कारणाकरीता सदर प्रवेश प्रमाणपत्राचा दुरुपयोग केला गेला, तर त्या व्यक्तीकडून मदत घेतली नसल्याचे सिध्द करण्याची जबाबदारी उमेदवारावर राहील. 28.3 आयोगाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” या विभागामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व तरतुदी काळजीपूर्वक वाचून त्यांचे कटाक्षाने अनुपालन करावे. 28.4 प्रवेश प्रमाणपत्रावर तसेच परीक्षेच्यावेळी पुरविण्यात येणा-या उत्तरपत्रिकेवर व प्रश्नपुस्तिकेवर दिलेल्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक वाचून त्यांचे अनुपालन करावे. 28.5 आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत लेखनिकाची मदत व/किंवा अनुग्रह कालावधी घेता येणार नाही. 28.6 परीक्षा उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक आदींकडून तसेच आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. 28.7 परीक्षेसंदर्भात आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांबाबत आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळाचे अवलोकन करणे, उमेदवाराच्या हिताचे राहील. |