नेहमीचे प्रश्न
१. आयोगा´या परीक्षांना कोण अर्ज करु शकते?
(1) संबंधित परीक्षा पदाच्या जाहिरातीमध्ये अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार विहित शैक्षणिक अर्हता /अनुभव/पात्रता धारण करणाऱ्या खालील व्यक्तींना अर्ज करता येईल .
अ ) भारताचा नागरिक किंवा
ब) नेपाळचा प्रजाजन किंवा
क) भूतानचा प्रजाजन किंवा
ड) भारतामध्ये स्थायिक होण्याच्या उद्देशाने १ जानेवारी १९६३ पूर्वी भारतामध्ये आलेला तिबेटी निर्वासित किंवा
इ ) भारतामध्ये कायम स्थायिक होण्याच्या उद्देशाने पाकिस्थान, श्रीलंका , ब्रह्मदेश आणि पूर्व आफ्रिकेमधील केनिया, युगांडा आणि (पूर्वी टांगानिका व झंजीवर नम्हणून ओळखले जाणारे ) टांझानियाचे संयुक्त प्रजासत्ताक जांबिया , झैरे , मालवी , इथियोपीया आणि व्हिएतनाम येथून स्थलांतर करून आलेली मूळची भारतीय असलेली अशी व्यक्ती असली पाहिजे .
२ - तथापि वरील ब ते इ या वर्गांतीळ या उमेद्वारांजवळ महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे दिलेले पात्रता प्रमाणपत्र असले पाहिजे ..
२. महाराष्ट्राची रहिवासी नसलेली व्यक्ती परीक्षा देऊ शकते का ..?
खुल्या सर्वसाधारण पदावरील निवडीकरिता महाराष्ट्राची रहिवासी नसलेली व्यक्ती परीक्षा देऊ शकते .
3. मराठी भाषेचे ज्ञान नसलेली व्यक्ती आयोगाच्या परीक्षा देऊ शकते का ?
मराठी लिहिता, वाचता, बोलता येत असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील .
४. आयोगाच्या परीक्षांना अर्ज करण्याची पद्धती काय आहे .?
१. आयोगाच्या या संकेतस्थळावर सर्व आवश्यक तपशिलाश प्रोफिले तयार करून संबंधित पद / भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फक्त ओंलीने पद्धतीने विहित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
२. विहित परीक्षा शुल्काचा भरणा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करता येईल.
३. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे सादर करायची आवश्यक्यता नाही.
४. सविस्तर सूचनांसाठी आयोगाच्या संकेतस्थळांवर - " उमेदवारांना सर्वसाधारण सूचना " व संबंधित जाहिरातींचे / अधिसूचनेचे अवलोकन करावे .